मारेगाव पंचायत समितीची वार्षिक आमसभा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज मारेगाव पंचायत समितीची "वार्षिक आमसभा" येथील बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. या सभेचे अध्यक्ष वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन नायब तहसीलदार महेश रामगुंडे, गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, कार्यकारी अभियंता निलेश काळबांडे, ह्यांची प्रामुख्याने मंचावर उपस्थिती होती. 
या सभेत आरोग्य, रस्ते विद्युत, पाणी, जल जिवन मिशन, यासह विविध विभागाच्या समस्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच विद्युतचा लंपडाव, रस्त्यावर पडलेले खड्डे, शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यामुळे निर्माण झालेली समस्या, अशा अनेक विभागाशी संबंधित मुद्द्यावर स्थानिक सरपंचानी प्रश्न लावुन धरले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाना उत्तरे दिली. मात्र,प्रलंबित प्रश्नाना उत्तरे देताना अनेक अधिकाऱ्याची तारांबळ उडाल्याची पाहायला मिळाली. 
दरम्यान,वन विभाग आणि पोलीस विभाग मात्र, सभेला अनुपस्थीत राहील्याने संबंधित विषयाचे प्रश्न अनुत्तरीत राहीले. यावेळी उपस्थित सरपंचांनी गावातील विकासकामाचे काही प्रश्न, समस्याचं निवारण करून घेतलं. शेवटी आमदार बोदकुरवार यांनी शासनाच्या अनेक योजनेची माहिती वर बोलताना नुकतेच शासनाने जाहीर केलेल्या "माझी लाडकी बहीण" योजनेचा लाभ घेण्याचं यावे आवाहन करून जनतेसाठी आपण ऑनलाईन सेवा केंद्र सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
वेळेअभावी महिनाभरात पुन्हा जलजिवन मिशनची विशेष सभा लावुन उर्वरीत समस्या मार्गी लावु अशा आशयाच्या सुचना देऊन वार्षिक सभेचा समारोप करण्यात आला. 
कार्यक्रमाचे संचालन मारेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधाकर जाधव यांनी, प्रास्ताविक गटविकास अधिकारी भिमराव व्हनखेडे तर, आभारप्रदर्शन पंचायत समिती कृषी विभागाचे विस्तार अधिकारी संदिप वाघमारे यांनी केले. 
मारेगाव पंचायत समितीची वार्षिक आमसभा मारेगाव पंचायत समितीची वार्षिक आमसभा Reviewed by सह्याद्री चौफेर on July 02, 2024 Rating: 5
Powered by Blogger.