युवा शक्ती विचार मंच व प्रतिभा लायब्ररी यांच्या वतीने वरोरा शहरांतील 58 गुणवंत विद्यार्थ्यांनचा सत्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वरोरावरोरा शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील दहावी व बारावीच्या 58 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार युवाशक्ती विचार मंच व प्रतिभा लायब्ररी वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात करण्यात आला. हा कार्यक्रम स्थानिक आलिशान लॉन वरोरा येथे थाटात संपन्न झाला. यावेळी स्वामी विवेकानंद व भारत माता यांचे प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. 

वरोरा शहराचे माजी नगराध्यक्ष अहेतेशामजी अली, गजानन मुंडकर गट विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा, युवाशक्ती विचार मंच वरोराचे अध्यक्ष गणेश नक्षीने, व लोकेश घाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश नक्षीने यांनी ले. यावेळी गजाननजी मुंडकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्व आणि स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कोणत्या प्रकारचे आव्हान येतात व दहावी बारावीनंतर काय करावे या सारख्या अनेक विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या आयुष्यातले वेगवेगळे अनुभव कथन केले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष श्री अहेतेशामजी आली यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या युगातील विद्यार्थी हा काय करू शकतो व त्याला त्याच्या जीवनातील सामोरे जाण्यासाठी चा मार्ग त्यांनी दिला.  
     
युवाशक्ती विचार मंच चे सदस्य सौरभ साखरकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले तर कोमल साखरकर हिने मान्यवरांचा परिचय करून दिला. व शकिल शेख यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने युवाशक्ती विचार मंच चे शकील शेख, लोकेश रुयारकर, सौरभ साखरकर, लोकेश घाटे, रोहित घाटे, छकुली पोटे, कोमल साखरकर, दिशा आगलावे, स्वाती हनुमनते, यांनी अथक परिश्रम घेतले. 
युवा शक्ती विचार मंच व प्रतिभा लायब्ररी यांच्या वतीने वरोरा शहरांतील 58 गुणवंत विद्यार्थ्यांनचा सत्कार युवा शक्ती विचार मंच व प्रतिभा लायब्ररी यांच्या वतीने वरोरा शहरांतील 58 गुणवंत विद्यार्थ्यांनचा सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on July 02, 2024 Rating: 5
Powered by Blogger.