टॉप बातम्या

31 जुलै पर्यंत पीक विम्याची मुदत वाढ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी शासनाने पंतप्रधान मंत्री पीक विमा योजना सुरू केली. यासाठी प्रधानमंत्री फसल योजना या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची असून शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी केवळ 15 जुलै हा लास्ट दिवस शिल्लक होता, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदणी केली नसेल अशा शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागत होती. सेतू सुविधा केंद्र आपलं सरकार या ठिकाणी विमा अर्ज भरून आज पिक विमा नोंदणी करण्यासाठी शेतकरी राजा जमा पोहचला होता. मात्र शासनाने ही धावपळ, दगदग लक्षात घेऊन आणि प्रत्येक शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यापासून कोणीही शेतकरी बांधव वंचित राहू नये या हेतूने शासनाने 31 जुलै पर्यंत पीकविमा भरण्याची मुदत वाढ दिली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना धावपळ दगदगीतून मोठा दिलासा मिळाला असल्याचे शेतकरी वर्गातून बोललं जात आहे. 

नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक हातभार मिळावा यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा प्रयत्न विमा योजनेतून केला जातो. या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या पीक निहाय प्रति हेक्टर विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा हप्ता रक्कम एक रुपया वगळता साधारण विमा हप्ता अनुदान म्हणून राज्य शासनाकडून अदा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली अशा सर्व शेतकऱ्याने शासन निर्णयानुसार एक रुपयात विमा ऑनलाइन नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस 15 जुलै ऐवजी आता शासनाने 31 जुलै पर्यंत मुदत वा दिल्याचे पत्र जाहीर केले. 

पिक विमा व लाडकी बहीण असे दोन्ही अर्ज कॉमन सर्विस सेंटर च्या माध्यमातून भरावयाच्या असल्याने, त्या यंत्रणेवर ताण आल्याने अनेक शेतकरी पिक विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहत असल्याची बाब निदर्शनास आली. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी विमा संरक्षण घ्यावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना देऊ केली होती. त्याला केंद्राने मंजुरी दिली,त्यामुळे उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Post Next Post