सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण असून ग्रामीण भागातील लोकांना तालुक्याचे ठिकानी दैनंदिन गरजासाठी तहसील, पंचायत समितीच्या कामानिमित्त यावे लागते. परंतु मारेगाव येथे प्रवाश्याकरिता बसस्थानक ची व्यवस्था नसलयामुळे बहुतांश महिलांना शौचालयाकरीता त्रास सहन करावा लागत असल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संघटनेचे जेष्ठ नेते देवराव वाटगुरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रालयात जाऊन निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. सदर मागणीची दखल घेऊन पाठपुरावा करणे करिता संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार भारतीय संविधानाला प्रमाण मानून लोकशाही पद्धतीने १६ जुलै पासून बस स्थानकाच्या राखीव जागेवर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असुन त्याची माहिती मारेगाव पोलिस स्टेशन ला देण्यात आली आहे. अशी माहिती बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते देवराव वाटगुरे व श्यामादादा कोलाम ब्रिगेड चे पांडुरंग टेकाम यांनी प्रसिध्दी पत्रकातून कळविले असुन निवेदनाच्या प्रती बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे व शामादादा कोलाम ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुमरे सहित प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांच्या कडे पुढील पाठपुरावा करण्यासाठी देण्यात आल्या, असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकातून जेष्ठ नेते देवराव वाटगुरे यांनी दिली आहे.