युवतीचे अंघोळ करताना मोबाईलने फोटो काढत होता, तेवढ्यात…

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आंघोळ करीत असलेल्या युवतीचे मोबाईलने फोटो काढत होता, तेवढ्यात तीची नजर त्याच्याकडे फिरकली आणि हा घृणास्पद प्रकार उजेडात आला. दिनांक 20 जूनला ही कार्यवाही करण्यात आली. मात्र,महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे वाढल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

सतेंद्र सुखरी प्रसाद (25) असे या आरोपीचे नाव आहे. ही घटना राजूर (कॉलरी) येथील आहे. तरुणी घरी स्नान करीत असतांना हा आरोपी बाथरूम जवळ आला, व छुप्या पद्धतीने तिचे भ्रमणध्वनी मध्ये शूट करू लागला. परंतु हे दुष्कृत्य करतांना या तरुणांवर तीची नजर फिरकली. तीने आरडाओरड करताच आरोपीने पोबारा केला.

तिने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. पालकांनी मुलीला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले. तीने पोलिसांसमोर घडलेला सर्व प्रकार सांगितला. फिर्यादीच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी सतेंद्र प्रसाद याच्या विरुद्ध भादंविच्या कलम 354 (सी), 354(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात दत्ता पेंडकर व जमादार अविनाश बनकर हे करीत आहे.

युवतीचे अंघोळ करताना मोबाईलने फोटो काढत होता, तेवढ्यात… युवतीचे अंघोळ करताना मोबाईलने फोटो काढत होता, तेवढ्यात… Reviewed by सह्याद्री चौफेर on June 22, 2024 Rating: 5
Powered by Blogger.