टॉप बातम्या

वळण रस्ता वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यात कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी गावाचा वळण रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. 

येथील गावाजवळील पूलाचे काम मागील चार महिन्यापासून संत गतीने चालू असल्याने गावाकऱ्यांना बाजूने जाण्यासाठी तयार केलेला वळण रस्ता पुराणे वाहून गेल्याची घटना घडली आहे. एकाच पावसात वळण रस्ता वाहून गेला. परिणामी गावातील नागरिकांना गावाबाहेर पडणे कठीण झाले असून जवळपासच्या चार ते पाच गावांचा संपर्क तुटला आहे.

वनोजा देवी मार्गावरील गावालगतचा वळण रस्ता दिनांक 22 जुन च्या रात्री आलेल्या पावसामुळे वाहून गेला आहे. हा वळण रस्ता इतका कमजोर आहे, की पहिल्याच पावसाने पूर्ण वाहून गेला. त्यामुळे नाल्या पलीकडील शेतकऱ्यांची पेरणीची कामे, विद्यार्थ्यांची शाळा, आरोग्याचा प्रश्न, दैनंदिन व्यवहार, शासकीय कामे अडली आहे. 

पावसाळा जवळ येत असल्यामुळे या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाची स्पीड वाढवण्यात यावी,पर्यायी मार्ग मजबूत करण्यात यावा, अशी मागणी कंत्राटदाराकडे अनेकदा वनोजा (देवी), येथील नागरिकांनी केली होती. परंतु, यांची दखल न घेतल्याने वळण रस्ता वाहून गेला,ही मानव निर्मित समस्या उभी झाली असून पर्यायी रस्ता प्रशासनाने त्वरित तयार करून द्यावा अशी मागणी वनोजा देवी येथील नागरिक करित आहे.
Previous Post Next Post