सारंग बोथले मित्र परिवाराचे शाखा अभियंता यांना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : कायर परिसरातील महावितरण कंपनीच्या जीर्ण झालेल्या विद्युत तारा मुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता बळावल्याबाबतचे निवेदन शाखा अभियंता मुकुटबन यांना 21 जून रोजी देण्यात आले. मात्र, अजूनही यासंदर्भात काही हालचाली झाल्या नसल्याने महावितरण कंपनीचा भोंगळ कारभाराची प्रचिती सारंग बोथले मित्र परिवाराने आणून दिली.

कायर रोड मलकापूर परिसरातील वीजेच्या जीर्ण तारामुळे कधी जीवितहानी होईल याचा काहीही नेम नाही. याबाबत संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले,मात्र पावसाळा लागला; दोन दिवस लोटूनही महावितरण कंपनीकडून कोणतीही उपाययोजना करत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते सारंग बोथले यांनी सांगितले. आग्रहाची विनंती आहे की,त्वरित नवीन वीज तारा जोडणी करून पुढील अनर्थ टाळावा, अशी मागणी निवेदनातून लवकरात लवकर निकाली काढण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते सारंग बोथले यांचे नेतृत्वात शाखा अभियंता मुकुटबन यांना करण्यात आली.

निवेदन देतेवेळी अक्षय पुल्लेवार, पिंकू गोहोकार, सुरज पुल्लेवार, अनुप चटकी, गणेश देठे, सतीश मोहितकर, व सारंग बोथले मित्र परिवार उपस्थित होते.
सारंग बोथले मित्र परिवाराचे शाखा अभियंता यांना निवेदन सारंग बोथले मित्र परिवाराचे शाखा अभियंता यांना निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 23, 2024 Rating: 5
Powered by Blogger.