शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरू -मनसे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : प्रशासन व वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने तालुक्यात शेतकरी त्रस्त आहे. “शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्यांना खपवून घेणार नाही”,शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरू, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी पत्रपरिषदेत खडसावून सांगितले.

मारेगाव शासकीय विश्राम गृहामधील आयोजित पत्रपरिषदेत बोलताना उंबरकर म्हणाले, एकीकडे शेतकऱ्यांवर चहूबाजूंनी संकट येत असतानाच पेरणी करण्यासाठी बियाणे खरेदी केल्यानंतर मात्र, काही बियाणे बोगस निघत आहेत. बेरोजगारी वाढली आहे, महावितरण चा भोंगळ कारभार सातत्याने सुरूच आहे, वनविभाग, कृषी विभाग, व तहसील यांचे जनतेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच आता राजू उंबरकर यांनी पत्र परिषद घेऊन तालुक्यातील समस्या उजागर करण्यासाठी सुरुवात केली आहे. विद्यमान लोकप्रतिनिधिवर ताशेरे ओढत लोकप्रतिनिधीचे उदासीन धोरण येथे कारणीभूत ठरत असल्याचा आरोप यावेळी उंबरकर यांनी केला.

तालुक्यातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असतानाच मनसेसैनिक रस्त्यावर उतरून प्रशासनाचा खरा मुकुट जनतेसमोर आणण्याचं कामं करणार असल्याचा गर्भीत ईशारा देण्यात आला.

या परिषदेत पक्ष नेते राजू उंबरकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, महिला तालुका अध्यक्ष उज्वला चंदनखेडे, उपाध्यक्ष उदय खिरटकर, शेख नबी, आदी तालुक्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरू -मनसे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरू -मनसे Reviewed by सह्याद्री चौफेर on June 23, 2024 Rating: 5
Powered by Blogger.