आटमुर्डी येथे गोठ्याला भिषण आग लागुन लाखोंचे नुकसान

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे 

राळेगाव : तालुक्यातील आटमुर्डी येथे दिनांक १०/६/२०२४ रोजी रात्री १२ वाजताच्या दरम्यान, येथीलच नानाजी भोकरे यांच्या गोठ्याला साटसर्कीटमुळे आग लागून गोठ्यात ठेऊन असलेला जनावरांचा चारा कडबा, कुटार, शेती उपयोगी साहीत्य तसेच मोटरसायकल जळुन खाक झाली असून यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची वार्ता वाऱ्या सारखी पसरताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, तर नगर पंचायत राळेगाव व यवतमाळ नगर पालिकेचे अग्निशामक वाहन बोलविण्यात आले. नगर पंचायतचे अग्निशामक वाहन व यवतमाळ वरुन अग्निशामक वाहन हे तातडीने घटनास्थळी पोहचुन आगीवर नियंत्रण करीत आग विझविण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. 

या लागलेल्या भीषण आगीत शेतकरी नानाजी भोकरे यांचे मात्र, ऐण शेतीच्या हंगामात शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची दखल प्रशासनाने घेऊन तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी परीसरातील नागरिकांची मागणी होत आहे.
आटमुर्डी येथे गोठ्याला भिषण आग लागुन लाखोंचे नुकसान आटमुर्डी येथे गोठ्याला भिषण आग लागुन लाखोंचे नुकसान Reviewed by सह्याद्री चौफेर on June 11, 2024 Rating: 5
Powered by Blogger.