अनुभविंना पराभूत करत मतदारांनी नवख्यांना दिली संधी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : देशासह महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्या, निकाल जाहिर झाले,नुकतेच बहुमत असलेल्या एनडीए ने नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा समर्थन दिले, ९ जून ला नरेंद्र मोदीसह अनेक नवनिर्वाचित उमेदवारांनी दिल्ली येथे तमाम देशभारतील आठ हजार आमंत्रित पाहुण्यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणाचा भाजपचे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष देखील साजरा करण्यात आला. परंतु यावेळीचा लोकसभेचा कुणालाही अपेक्षीत नसणारा निकाल महाराष्ट्रातील जनतेने दिल्याचे एकंदरीत चित्र सध्या पहावयास मिळत असून महाराष्ट्रात सर्वांच्या नजरा विदर्भाकडे त्यातल्या त्यात चंद्रपूर,जिल्ह्यातील निकालाकडे होत्या. 

चंद्रपूर जिल्ह्यात कधी नव्हे एवढी अतीतटीची निवडणुक झाली आणि धक्कादायक निकाल समोर आलेत. मंत्र्यांना पराभूत करून मतदारांनी आमदारांना खासदार केले. एक गोष्ट या ठिकाणी मात्र, प्रकाशाने जाणवली. प्रथमच महिला खासदार झाली याचा आनंद महिलांवर्गासह सर्व सामान्यांना नक्कीच आहे. यात काही दुमत नाही पण विकासात्मक दृष्ट्या सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरचे खासदार होणे ही काळाची गरज होती. प्रतिभा धानोरकर विकास करणार नाहीत असे नाही, तेही चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकडे नक्कीच लक्ष देतील पण या मतदार संघाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न रोजगाराचा आहे आणि तो सुधीर मुनगंटीवार खासदार झाले असते तर नक्कीच निकाली निघला असता, अशी कुजबुज आता निकालानंतर ऐकण्यास मिळत आहे. 

भैय्या यांच्या खासदारकीच्या काळात या प्रश्नाला गती मिळत असतांना निवडणूकीत 'दे धक्का' चा खेळ खंडोबा सुरु असल्याने या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने सुशिक्षितांच्या रोजगाराचा प्रश्न दुर्लक्षीत राहीला. ह्या प्रश्नासह विविध जिव्हाळ्याचे प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील या मतदार संघातील जनतेचे आहेत त्या सर्व प्रश्नांना वास्तविक स्वरूप देणे आता प्रतिभा धानोरकर यांचे कर्तव्य आहे. म्हणून बापा ऊतु नका मातु नका घेतला वसा टाकु नका! असे सूचक ऊदगार आता जनतेतुन व्यक्त होऊ लागले आहे.
अनुभविंना पराभूत करत मतदारांनी नवख्यांना दिली संधी अनुभविंना पराभूत करत मतदारांनी नवख्यांना दिली संधी Reviewed by सह्याद्री चौफेर on June 11, 2024 Rating: 5
Powered by Blogger.