सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : सिनेस्टाईलने पाठलाग करून तहसीलदार श्री उत्तम निलावाड साहेब यांनी पाच महिन्याअगोदर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना ट्रक वर जप्ती ची कारवाई केली होती. तोच ट्रक मारेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत तहसील प्रशासन यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मारेगाव तालुक्यात अवैध उत्खनन करून तस्करी करणाऱ्यांच्या वाळू चोराचे मुसक्या आवळण्यासाठी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग निर्भीडपणे कंबर काम करित आहे. तहसीलदार उत्तम निलावाड हे आल्यापासून आतापर्यंत जवळपास 23 च्या वर वाहनांवर दंडात्मक कारवाया, आणि 4 वाहन धारक यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन मारेगांव येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर अमरावती विभागात तस्कराच्या मुसक्या व वाळू वर नियंत्रण मिळवण्यात मारेगाव महसूल विभाग प्रथमस्थानी आल्यामुळे साहजिकच मारेगाव महसूल विभागाचे पथक आणखीच ऍक्टिव्ह झाले आहे. मात्र,दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी जप्ती करण्यात आलेला ट्रक अज्ञाताने तहसीलमधून लांबवीला आहे.
मागील फेब्रुवारी महिन्यात अवैध वाळू उत्खनन करून वाळू भरलेला ट्रक क्र. (MH 36 - 1675) या वाहनावर तालुक्यातील मौजे महादापेठ येथे पाच किलोमीटर सिनेस्टाईलने पाठलाग करून पकडला होता. महसूल विभागाने सदरील वाहनातील वाळू तहसील कार्यालयाच्या कंपाउंडमध्ये जमिनीवर टाकून सदरचे ट्रक तहसील आवारात उभा करण्यात आला होता. सदर वाहनाबाबत दिनांक 07/02/2024 रोजी मा. उपविभागीय अधिकारी वणी यांना प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलेला आहे. मात्र, जप्तीच्या जाचक अटीने व दंडात्मक कारवाईने मागील चार महिन्यापासून जप्त असलेले वाहन (ट्रक) तहसील कार्यालयाच्या समोर उभे लावलेले होते.
दरम्यान, 15 ते 17 जून 2024 या तीन दिवसाच्या सुट्ट्याचा कालावधीत अज्ञाताने हा उभा असलेला ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारातून चक्क! चोरून नेल्याची तक्रार महसूल विभागाने पोलिसात केली आहे. श्री. सतिष गुलाबराव सुरुळकर रा. 771, कबिर वार्ड न. 9 खापा तालुका सावनेर जि. नागपूर या मूळ मालकाचे वाहन असून ट्रकची किंमत रुपये 9,00000/- (अक्षरी नऊ लाख रुपये) आहे. मात्र, या आश्चर्यजनक घटनेने तालुक्यात पुरती खळबळ उडाली असून घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करित आहे.
चक्क! तहसील कार्यालयाच्या प्रांगनातून जप्ती केलेले वाहन नेले चोरून
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 21, 2024
Rating: