सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : प्रकरणात थोडक्यात हकीगत अशी की, मौजे सराटी येथील गट क्रमांक 5 मधील जमीन मालक/अर्जदार भास्कर गोसाई सपाट व इतर हे रस्ता मिळावा म्हणून अर्ज सादर केला होता. श्री.उत्तम निलावाड तहसीलदार म्हणून तहसील कार्यालय मारेगांव येथे दिनांक 13 जून 2023 रोजी रुजू होऊन सबंधीताचे म्हणणे ऐकून सदर रस्त्याचा निकाल/आदेश दिनांक 13 जुलै 2023 रोजी पारित केला. आदेश पारित केल्यानंतरही गैरअर्जदार/गट क्रमांक 114 चे जमीन मालक नरेंद्र अर्जुन आस्कर व त्याची दोन मुले दोन वेळा त्या त्या वेळी कार्यरत असलेले मंडळ अधिकारी व तलाठी यांनी प्रयत्न करुन ही रस्ता देण्यास तयार नव्हते. पुन्हा अर्जदार हे दिनांक 19 जून 2024, बुधवार रोजी तहसील कार्यालय मारेगांव येथे उपोषणास बसले, उपोषणास बसल्यानंतर तहसीलदार मारेगाव यांनी सदरचा रस्ता दिनांक 21 जून 2024 रोजी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी जायमोक्याच्या ठिकाणी उपस्थित राहून मोकळा करून देतील असे आश्वासन दिले. नंतर मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदरच्या ठिकाणी आपण स्वतः उपस्थित राहावे अशी तहसीलदार यांना विनंती केल्यानंतर तहसीलदार स्वतः आज दिनांक 21 जून 2024 रोजी प्रत्यक्ष जायमोक्याच्या ठिकाणी उपस्थित राहून अर्जदार व गैरअर्जदार यांना समजावून सांगून मागील वर्षी जो आदेश पारित केलेला आहे त्या आदेशाप्रमाणे रस्ता देणे आवश्यक असल्याचे सांगून आदेशाप्रमाणे अडविलेला रस्ता मोकळा करून देण्यात आला. शेवटी अर्जदार व गैरहजर यांनी मा. तहसीलदार साहेब व मंडळ अधिकारी, तलाठी यांचे आभार मानून आमचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात आल्याच्या भावना व्यक्त करून आभार मानले.
सराटी येथील एक वर्षापासून सुटत नसलेला रस्त्याचा विषय अखेर निकाली काढला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 21, 2024
Rating: