अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तीन हवसखोरांना अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणीत महिलां, तरुणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न एरणीवर आल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील राजूर (कॉ.) येथील तीन हवसखोरांनी चायनिजच्या दुकानावर काम करणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे रात्री तीन चाकी वाहनातून किडनॅप करून तिला वणी-घुग्गुस मार्गावर सुनसान अशा ठिकाणी नेले. तेथे तिघांनीही या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेने जनसामान्यातून संताप व्यक्त होत आहे.

तरुणांनी त्यानंतर तिला वणीत आणून सोडले. नराधमांच्या या आपत्तीजनक कृत्याने अल्पवयीन मुलगी चांगलीच भेदारली. तिला काय करावे काहीही सुचेनासे झाले. अखेर अत्याचाराने बळी ठरलेल्या पिडीतेने पोलीस ठाणे गाठून पोलिसांसमोर घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपींविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली. पिडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अवघ्या काही तासांतच नराधमांना ताब्यात घेत अटक केली.

शंकर उर्फ राकेश नामदेव भोस्कर (24), राहुल राकेश यादव (25), शंकर यादव (27) तिघेही रा. राजूर (कॉ.), अशी या पोलिसांनी गजाआड केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तीनही आरोपींवर पोलिसांनी भादंविच्या कलम 376, 366, 506 नुसार गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर करीत आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तीन हवसखोरांना अटक अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तीन हवसखोरांना अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on June 20, 2024 Rating: 5
Powered by Blogger.