सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शिक्षक सन्मान संघ महाराष्ट्र प्रणित शिक्षक सन्मान अभियाना अंतर्गत राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळा 16 जून ला अमरावती येथे अभियंता भवनात आयोजित केला आहे.
राज्यस्तरीय सत्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील 40 उत्कृष्ट शिक्षक, सामजिक, प्रशासकीय सेवेत अग्रणी लोकांचा व काही संस्थाना राष्ट्रनिर्माता पुरस्कार 2024 देवून सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील युवा पत्रकार निलेश चौधरी यांची राज्य स्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यांना होणाऱ्या कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आले आहे.
पत्रकार निलेश चौधरी यांना राष्ट्रनिर्माता पुरस्कार जाहीर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 10, 2024
Rating: