सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वरोरा : येथील प्रसिद्ध स्वर्गीय बाबा आमटे यांच्या "आनंदवन" आश्रमात एका पंचवीस वर्षीय तरुणीचा निर्दयी खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस असून, तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
आरती दिगंबर चंद्रवंशी (25) रा. आनंदवन वरोरा असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती बऱ्याच वर्षांपासून आनंदवनात आपल्या आई व अंध वडिलांसह राहत होती. या घटनेसंबंधित एका 26 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आल्याचे समजते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण गेल्या काही महिन्यांपासून आनंदवनमध्ये दाखल होता, आरती चंद्रवंशी हिची हत्या केल्याचे त्याने पोलिसासमोर कबूल केले. त्याने बुधवारीच्या रात्री आरोपी समाधान कोळी रा. चोपडा जिल्हा जळगाव ह. मु. याने आरतीची हत्या केली. 26 जून रोजी आईवडील उपचारासाठी सेवाग्राम येथे होते, ते उशिरा आल्यानंतर तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घरातील बाथरूम आढळून आला होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एलसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफीने व जलद गतीने शोध घेतल्यानंतर चोपडा जि.जळगाव ह. मु. वरोरा येथील संशयित आरोपी समाधान कोळी याला अटक केली आहे. गुन्ह्याचा हेतू व पद्धत निष्पन्न करण्याकरता पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे.
सदर कारवाई श्री. मुंमक्का सुदर्शन, मा.पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रीना जनबंधू, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती नायोमी साटम, सहायक पोलिस अधीक्षक, उपविभाग वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन वरोरा येथील पोलीस निरिक्षक अमोल काचोरे, स. पो.नी विनोद जांभळे, पो. उप नि धीरज मसराम, पोहेका दिलीप सुर, दीपक दुधे, किशोर बोधे, पोलीस अंमलदार मोहन निषाद, शशांक बदामवार, महेश गवतूरे, रोशन तमशेट्वार यांनी केली.
"यापूर्वीही याच आनंदवनात आत्महत्येचे प्रकरण तापले होते, मात्र वर्ष उलटले. परंतु पोलिसांचे हात अजूनही रिकामेच आहेत, आता ते आत्महत्या प्रकरण कधी उघड होणार का? असा प्रश्न उपस्थित या नुकत्याच "मर्डर" प्रकरणाने होत आहे. "
आनंदवनात २५ वर्षीय तरुणीचा "मर्डर"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 27, 2024
Rating: