महसूल सहाय्यक प्रवीणकुमार पोहरकर यांना २९ जून पर्यंत पोलीस कोठडी!


सह्याद्री चौफेर | लखन लोंढे 

महागांव : मागील ३ महिन्यापूर्वी महागांव तहसील मधील भ्रष्ट महसूल सहाय्यक प्रवीणकुमार पोहरकर यांचे विरोधात पुराव्यासहित भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर, त्याने आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी महागांवच्या ३ पत्रकारांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल केले होते. 

हिवरा येथील पांडूरंग सखाराम आंडगे या शेतकर्‍याने पांदण रस्ता खूला करुन मिळण्यासाठी प्रकरण गेल्या ३ वर्षापासून सुरु असून शेतकरी आंडगे यांनी न्याय मागण्यासाठी ५ वेळा उपोषण केले. परंतू महागांव तहसील व जिल्हा प्रशासनाने सातत्याने घोर निराशा करत शेतकरी आंडगे यांना न्याय तर दिलाच नाही. परंतू महसूल खात्याला काळीमा असणारा महसूल सहाय्यक यांनी दि. २१/०६/२०२४ रोजी ४० हजार रुपयाची लाच मागीतली. तडजोडीअंती ३० हजार रुपयांमध्ये बोलणी फिक्स झाली होती.
शेतीसाठी जाण्याकरिता रस्ता नसल्यामुळे त्रासाने मेटाकूळीस आलेल्या शेतकरी पांडूरंग आंडगे यांनी थेट एसीबी कार्यालय, यवतमाळ गाठले, आणि अनेक दिवसापासून भ्रष्टाचार करणारा महसूल सहाय्यक प्रवीणकुमार पोहरकर याला ३० हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात पकडून देवून चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे तहसील प्रशासनात खळबळ उडाली आहे. उशीरापर्यंत आरोपी प्रवीणकुमार पोहरकर याची चौकशी सुरु होती. पुसद सत्र न्यायालयाने आरोपी महसूल सहाय्यक प्रवीणकुमार पोहरकर यास २९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे कळते. सदर कार्यवाही लाच लुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या टीमने सापळा रचून ही कारवाई पार पाडली.
महसूल सहाय्यक प्रवीणकुमार पोहरकर यांना २९ जून पर्यंत पोलीस कोठडी! महसूल सहाय्यक प्रवीणकुमार पोहरकर यांना २९ जून पर्यंत पोलीस कोठडी! Reviewed by सह्याद्री चौफेर on June 27, 2024 Rating: 5
Powered by Blogger.