दरोड्यातील 3 आरोपी नागपूर रेल्वे स्टेशन येथून अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : केळापूर तालुक्यातील करंजी येथील वाहन चालकाला मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना 7 जून रोजी घोगुलधरा (ता. मारेगाव) फाट्यावर घडली होती. या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना नागपूर रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली.ही कारवाई यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली.

करंजी येथील सलीम सुलतान गिलाणी (44) हे आपल्या वाहनात पॅसेंजर घेऊन जात असताना मारेगाव तालुक्यातील बोटोणीच्या समोर घोगुलधरा फाट्यावर गिलाणी यांना लाथाबुक्क्‌यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. यावेळी चाकूचा धाक दाखवून 20 हजार 900 रुपये बळजबरीने हिसकावले. या प्रकरणी पो.स्टे मारेगाव येथे फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरुन अप क्र. 198/24 कलम 395, 364 (अ), 342, 326, 504, 506, भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, इतर आरोपी फरार होते.

फरार आरोपींचा शोध घेत असताना सदर तिघे नागपूर येथून बाहेर राज्यात जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांना मिळाली. त्यावरून सपोनि अमोल मुडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा वणी, पांढरकवडा आणि यवतमाळचे पथक नागपूरकडे सरकारी व खासगी वाहनाने रवाना होवुन नागपुर रेल्वे स्थानक परीसरात वेगवेगळे पथक तयार करुन आरोपींचा कसोशिने शोध घेतला असता आरोंपीना पोलीस दिसताच पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ चे पथकांनी आरोपींचा पाठलाग करुन रेल्वे स्टेशन परीसरातुन नमुद तीनही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. शुभम सुधाकर कापसे (30) रा. जामनकरनगर यवतमाळ, विकास दिनेश खुडे (31), सूरजनगर यवतमाळ व प्रफुल्ल नारायणराव चौकडे (36) रा. आठवडीबाजार यवतमाळ या तिघांना ताब्यात घेतले. तसेच आरोपींना गुन्हयात वापरलेल्या वाहनाबाबत विचारपुस करुन स्क्रापीयो वाहन क्र (एम एच 14 डी ऐ 2727) किमंत अंदाजे 12,000,00 /- रुपयेची ताब्यात घेवुन आरोपी सह पुढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशन मारेगाव येथे पोहचुन तपासी अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले. 

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सपोनी अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोलीस अमलंदार उल्हास कुरकुटे, नरेश राउत, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, सतिष फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
दरोड्यातील 3 आरोपी नागपूर रेल्वे स्टेशन येथून अटक दरोड्यातील 3 आरोपी नागपूर रेल्वे स्टेशन येथून अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on June 28, 2024 Rating: 5
Powered by Blogger.