देवतळे दाम्पत्यांचे सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मोठे यश मिळाल्यानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणूकीसाठी रणनिती आखणे सुरु केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षातील गटाचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही अशी ताठ भूमिका घेतली आहे. त्याचा एक भाग म्हणून चंद्रपूरातील माजी जि.प. सदस्य डॉ. आसावरी देवतळे आणि त्यांचे पती विजय देवतळे यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कार्यवाही सुरु केली असून, त्याचाच एक भाग म्हणून देवतळे दाम्पत्यांचे निलंबन करण्यात आले आहे. विजय देवतळे यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तसेच 2023 मध्ये कृ.उ.बा. समितीच्या वरोरा निवडणुकीत भाजपासोबत हातमिळवणी करुन काँग्रेस उमेदवारांना पराभूत केले होते.

2024 च्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत देखील त्यांची भूमिका पक्षविरोधी होती. यासर्व बाबींचा विचार करुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने देवतळे दाम्पत्यांचे निलंबन केले आहे, असे पत्र त्यांना देण्यात आले आहे.
देवतळे दाम्पत्यांचे सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित देवतळे दाम्पत्यांचे सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित Reviewed by सह्याद्री चौफेर on June 28, 2024 Rating: 5
Powered by Blogger.