सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : बसअभावी शालेय विद्यार्थ्यांना सहा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्यामुळे महागांव बस स्टॉप ते सिंधी-महागावात बस फेरी सुरू करण्यात यावी, अशा आशयचे निवेदन आज (ता.२८) जून रोजी महागांव येथील उपसरपंचांनी वणी आगार प्रमुख यांना दिले.
शासनाने विद्यार्थ्यांकरिता शिक्षण घेण्याच्या दृष्टीकोणातून शाळेत येजा करण्यासाठी मानव विकास मिशन ची बस सेवा विना मूल्य करण्यात आली आहे. या मानव विकास अंतर्गत ग्रामीण भागाला जास्त प्राध्यान देण्यात आले असून,आजही मात्र तालुक्यातील अनेक गावापर्यंत बस सेवा पोहचत नाही. अशीच काहींसी स्थिती महागांव येथे आहे.
महागांव बस स्टॉप ते महागांव पर्यंत बस सेवा नसल्याने कुंभा भारत विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांना जाण्यासाठी बस अभावी पायपीट करावी लागत आहे. परिणामी सन २४-२५ या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून उपसरपंच अविनाश लांबट यांनी मानव विकास मिशन व अहिल्यादेवी होळकर अंतर्गत महागांव ते महागांव स्टॉप पर्यंत बस सेवा तत्काळ सुरू करण्याची निवेदनातून मागणी केली आहे. निवेदन देताना सरपंच रामचंद्र जवादे (दापोरा गट ग्रामपंचायत) हे उपस्थित होते.
बसअभावी शालेय विद्यार्थ्यांची सहा किलोमीटर पायपीट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 28, 2024
Rating: