सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेचा खोळंबा सुरु आहे. संपूर्ण उन्हाळा ग्रामीण भागातील नागरिकांनी त्रास सहन केला. आता पावसाळा सुरु झाला असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साप, विंचू अशा सरपटणा-या प्राण्यांचा वावर असतो. रात्रीच्या वेळी हे प्राणी दिसत नसल्याने अनेकाना या प्राण्यांचा दंश होतो. प्रसंगी लोकांना जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे मंदर येथील रहिवाशांनी महावितरणच्या कार्यालयात संजय खाडे यांच्या नेतृत्वात अधिका-यांची भेट घेतली. यावेळी निवेदन देत विद्युत वितरण सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देते वेळी गणेश, देवराव देऊळकर, किशोर बोढे, विजय परसुटकर, प्रतिक बुरडकर, गणेश निखार, अरविंद भट, प्रवीण उपे, संदीप गोपाळकर, संदीप निब्रड, बंडू उपरे, वैभव सोयाम, प्रवीण करडभुजे, आशिष बुच्चे, विजय बोढे, गुरुनाथ आडे, अल्ताफ शेख, अमोल चोपणे, संजय कापसे, महादेव बुचे यांच्यासह मंदर येथील रहिवासी उपस्थित होते.
अन्यथा कार्यालयावर धडकतालुक्यात मंदरच नाही तर उकणी, भालर, लाठी इत्यादी गावात देखील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. याबाबत अधिका-यांशी चर्चा केली आहे. त्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र समस्या सुटली नाही. किंवा रात्री लाईट गेल्याने सर्पदंशासारखा अनुचित प्रकार झाल्यास महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली जाईल. - संजय खाडे
संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांचे निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 28, 2024
Rating: