सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
नागपूर : राज्यातील दलीत आदिवासी समाजाच्या लोकांनी महसूल व वन जमिनीवर शेती प्रयोजनसाठी अतिक्रमण केलेले असुन दरवर्षी मशागत करून जीवनावश्यक जिन्नसाची पेरणी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवतात. परंतु तत्कालीन सरकारने 12 जुलै 2011 शासन निर्णय निर्गमित केल्यामुळे त्या शासन निर्णयामुळे राज्यातील दलीत आदिवासी समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी हया धोक्यात आल्या आहेत.
वर्षां नु वर्ष सदर जमिनीवर अवलंबून असलेल्या लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी जर निष्कासित झाल्या तर हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी लॉर्ड बुद्धा चे भैय्यासाहेब खैरकर यांच्या अध्क्षतेखालील तत्काळ नागपूर येथील नागभवन येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित करून आंबेडकर चळवळीतले विचारवंत यांना निमंत्रित करून दलीत आदिवासी समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी धोक्यात आल्या असुन तात्काळ उपाययोजना करणे काळाची गरज असल्याचे सांगून लवकरच राज्यव्यापी परिषद नागपूर येथे आयोजित करून सरकारचे लक्ष्य केंद्रित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,असे मत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी बैठकीत व्यक्त केले असता बैठकीला अवरजून उपस्थित असलेले भंते हर्षबोधी यानी सांगितले की दलीत आदिवासी समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी जर धोक्यात आल्या असतील तर लवकरच उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या उपस्थित नागपूर येथे राज्यव्यापी परिषद घेण्यासाठी ठराव सर्वानुमते घेण्यात आला व एक शिषटमंडळ देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती बैठकीत सांगीतली.
यावेळी मानावी हक्क सुरक्षा दलाचे प्रदेश अध्यक्ष अशोक तिडके, बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे युवा नेते अजय भाऊ मंडपे, आंबेडकर विचारवंत पुरण मेश्राम, प्रेमलाल उके, भैय्यासाहेब खैरकर, सचिन मुन सहित शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे उपस्थित असुन पहिल्याच बैठकीत दलीत आदिवासी समाजाच्या लोकांना न्याय हक्कासाठी भंते हर्षबोधी यानी उपाय योजना सांगितल्यामुळे बैठकित बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून सर्वांनी आभार व्यक्त केले.
बिगर सातबारा शेतकरी संघटनेची नागपूर येथे बैठक संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 28, 2024
Rating: