शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

वणी : शिरपूर पोलीस स्टेशन हद्धीत येत असलेल्या परीसरात दिवसभर मटका, झंडीमुंडी, तीन पत्ती, गांजा विक्री चा महापूर वाहतो. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी अवैध व्यवसाय समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आदेशीत करावे, अशा आशयचे निवेदन राष्ट्रवादी (पवार गट) च्या वतीने वणी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ व आयुक्त अमरावती यांना देण्यात आले.  
शिरपूर पोलीस स्टेशन च्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका बाजार खुलेआम भरतोच कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भालर कॉलनी, तरोडा, सुंदर नगर,बेलोरा पुलिया, ढाकोरी, मुंगोली, शिंदोला, अभय फाटा, चारगाव चौकी येथे दिवसभर अवैध धंदे सुरू असुन अनेक ठिकाणावरून या ठिकाणी मटका, जुगार खेळण्यास नागरिक येथे येतात. सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला असून कास्तकार पैसे घेऊन येतात व मटका, जुगार, झंडीमुंडी खेळतात, यात ते संपूर्ण पैसा हारून जातात. त्यामुळे या परीसरात जोमात वाढलेला अवैध बाजार शिरपूर ठाण्याच्या हद्दीतून बंद व्हावा यासाठी वणी शहराध्यक्ष किशोर काळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (पवार गट) यांच्या नेतृत्वात मागणी करण्यात आली आहे. आजचा युवा वर्ग या अवैध मटका, जुगार, गांजा च्या व्यसनाने उध्वस्त होण्याच्या मार्गांवर असून याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्न होत आहे. पोलीस कारवाई का होत नाही, पंरतु जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन करण्याचा विडा उचलला आहे. त्याला मात्र स्थानिक पोलीसांनी पाठ दाखविली आहे. रोज मजुरी, बांधकाम मजुर या ठिकाणी येवुन मटक्यावर आपले पैसे लावतात त्यामुळे आलेली सर्व मजुरी मटका चालविणाऱ्याला देवुन दारू ढोसुन घरी मुलाबाळांना मारहाण करण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहे. त्यामुळे शिरपूर ठाण्याच्या हद्दीतील अवैधरित्या मटका बाजार त्वरीत बंद करून बाजार पुन्हा सुरू होवु नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी विशेष उपाययोजना आखावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष किशोर काळे यांनी मागणी केली आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किशोर काळे युवा शहर अध्यक्ष, मुबीन शेख युवा जिल्हा उपाध्यक्ष, धनराज येसेकर, योगेश्वर चौधरी, शशिकांत चौधरी, प्रशील खाडे,आर्या राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 
शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा  Reviewed by सह्याद्री चौफेर on June 29, 2024 Rating: 5
Powered by Blogger.