पांढरकवडा येथील बालकाच्या हत्येप्रकरणी आरोपी गजाआड


सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार 

पांढरकवडा : मोहल्यात राहणाऱ्या मोहल्यातीलच बालकाची त्याच्या सम वयाच्या बालकाने चाकूने वार करून हत्या केल्याने पांढरकवडा शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे नऊ ते दहा वाजता च्या दरम्यान समोर आली आहे.

सय्यद नावेद सय्यद हारून (16) असे मृतक बालकाचे नाव आहे. तो चिकन सेंटर वर मजुरीने काम करत होता, अशी माहिती आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पांढरकवडा पोलिसांनी रात्रीच आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, आई नजीमा सय्यद, मोठा मुलगा सय्यद मुनीर, सय्यद नावेद व सर्वात लहान मुलगी अल्फीया सय्यद हे तिघेही रा. चंद्रशेखर वार्ड, पांढरकवडा येथे एकत्र राहतात. नावेद हा पांढरकवडा येथील चिकनच्या दुकानांमध्ये मजुरीचे काम करीत असून तो सकाळीच 7 वाजता कामावर जातो आणि रात्री 9 ते 9.30 वाजता च्या दरम्यान,आपल्या घरी परत येतो. शुक्रवार दिनांक 28/06/2024 रोजी रात्री परत येत असतानाच मोहल्यात राहणाऱ्या वार्डातील बालकाचे रस्त्यात नावेद याच्याशी भांडण सुरू आहे असे समजले. भांडणाच्या दिशेने सय्यद नावेदचे कुटुंबिय गेले असता त्याच्या पाठीत चाकू भोकसला होता, तेव्हाच आईने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला असता नावेद रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. दरम्यान, घटनास्थळावर आलेल्या फिर्यादी सह बहिण व बहिणीचा पती व नातेवाईकांच्या मदतीने त्यांनी गंभीर अवस्थेत असलेल्या सय्यद नावेद सय्यद हारून याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अति रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला यवतमाळ येथे हलविण्यात आले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून तो मृत पावल्याचे घोषित केले. या एकसारख्या वयाच्या बालकाची हत्येने शहरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील आरोपी केवळ सोळा वर्षाचा असून त्याला रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात 302 अन्वये गुन्हा दाखल केला नेमका खून कोणत्या कारणाखाली केला, याबाबत निश्चित माहिती पोलिसांनी दिली नाही. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी सुरु केली असून लवकरच आरोपीच्या विरोधात आरोप पत्र तयार करण्यात येईल असेही सांगण्यात आले. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार दिनेश झामरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजभिये तपास करीत आहे.
पांढरकवडा येथील बालकाच्या हत्येप्रकरणी आरोपी गजाआड पांढरकवडा येथील बालकाच्या हत्येप्रकरणी आरोपी गजाआड  Reviewed by सह्याद्री चौफेर on June 29, 2024 Rating: 5
Powered by Blogger.