काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी समितीची आज यवतमाळमध्ये बैठक

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार 'दुष्काळ पाहणी समिती' गठीत केली आहे. अमरावती विभागाच्या समिती प्रमुखपदी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना जबाबदारी दिली असून या समितीची आढावा बैठक आज शनिवारी दि.1जून रोजी काँग्रेस कार्यालयात, यवतमाळ येथे पार पडली आहे. 

या बैठकीस गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय आदिवासी अध्यक्ष माननीय शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, मा. आमदार वझाहत मिर्झा, दिलीपराव येडतकर, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख, काँग्रेस समितीचे सचिव मा. जावेद अन्सारी, देवानंद पवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रशासन, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष संध्याताई बोबडे, शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, अनिल गायकवाड, उषाताई दिवटे, वसंत जिनींग अध्यक्ष आशिष खुलसंगे, घनश्याम पावडे वणी तालुका अध्यक्ष, मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. संपूर्ण यवतमाळ जिल्हा भीषण दुष्काळात होरपळत असून पिण्याचे पाणी मोठी टंचाई निर्माण झाली आहे. भयंकर परिस्थिती असताना सरकारकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. पाण्याचे टँकर, बियाणे टंचाई, पिक कर्ज अद्याप सुरु नाहीत. सरकारला या परिस्थितीचे गांभीर्यही नाही यामुळे विरोधी पक्ष नात्याने सरकारला दुष्काळ प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्यासाठी काँग्रेसने अमरावती विभागवार यशोमती ठाकूर यांची निवड करून अमरावती विभागाची प्रमुख पदाची जबाबदारी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

यावेळी तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी मारेगाव तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जाबाबत, वारंवार खंडीत होणारा विजेचा प्रश्न, तालुक्यातील पाण्याची टंचाई, हे प्रश्न प्रामुख्याने मांडले. त्यावर बैठकीत विशेषत: शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत माणिकराव ठाकरे, वामनराव कासावार यांनी मनिष पाटील यांच्या सोबत चर्चा करून येत्या सात दिवसात कर्ज वाटप सुरळीत करू असे माजी मंत्री यशोमती ठाकूर, यांनी सांगितले असल्याचे ता. अध्यक्ष मारोती गौरकार यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना माहिती दिली. 
काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी समितीची आज यवतमाळमध्ये बैठक काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी समितीची आज यवतमाळमध्ये बैठक Reviewed by सह्याद्री चौफेर on June 01, 2024 Rating: 5
Powered by Blogger.