गुणवंत विद्यार्थीनी वैभवी महाकुलकर हीचा सत्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील श्री रंगनाथ स्वामी मंदिरात श्री रंगनाथ सेवा समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. यात गुणवंत विद्यार्थीनीं वैभवी महाकुलकर हिचा सत्कार करण्यात आला. वैभवीने एल टी कॉलेज विज्ञान शाखेमध्ये 12 मध्ये 86.17 टक्के घेऊन वणी तालुक्यातून पहिला येण्याचा बहुमान पटकाविल्याने तीला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

मागील अनेक वर्षापासून श्री रंगनाथ सेवा समितीच्या वतीने दर शनिवारी पंचमुखी हनुमान मंदीर येथे हनुमान चालिसा पठण व श्री रंगनाथ मंदिरात भगवान विष्णूची आरती व महाप्रसादाचे वितरण दानदात्यांच्या हस्ते करण्यात येत असते. तसेच गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनीचा सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात येतो, आज शनिवारी (1 जून) रोजी वैभवी चा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विजय महाकुलकर यांच्या तर्फे प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाला उपस्थित सत्कार मूर्ती वैभवी व तिचे वडील विजय महाकुलकर माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते राजू तुरणकर, समितीचे अध्यक्ष विशाल ठोंबरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दूधलकर, सचिव राजेश मार्गमवार, सहसचिव रविंद्र गौरकर, उत्तम दोरखंडे, महेंद्र तुगनायत, आशिष काळे, गजानन भडगरे, माजी सैनिक, सचिन पिदुरकर, सचिन पारटकर, शामराव नागपुरे, अरूण बुरटकर तसेच बालगोपाल रोहित ठोंबरे, साहील, दूधलकर मिलमिले, रेवणनाथ दोरखंडे, विश्व पिदुरकर, गोविंदा मुजेवार, प्रण्य मोरे, यासह समितचे सभासद व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थीनी वैभवी महाकुलकर हीचा सत्कार गुणवंत विद्यार्थीनी वैभवी महाकुलकर हीचा सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on June 02, 2024 Rating: 5
Powered by Blogger.