चिंचाळा येथून एक लाखाचे बोगस बियाणे जप्त

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे गुरुवारी (ता.8 मे) रोजी दुपारी 2.30 वाजता धाड मारून 1 लाख 1 हजार 202 रुपये किंमतीचे कपाशीचे बोगस बियाणे यवतमाळ-मारेगाव कृषी विभागाच्या संयुक्त भरारी पथकाने पकडले. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात एका जणाविरुध्द गुन्हा दाखल नोंद झाला. 

मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिंचाळा येथे एक व्यक्ती बीजी 4 बीज 5 नावाचे बोगस कपाशी चे बी-बियाणे विक्रीसाठी बोगस बियाणे विक्रीसाठी आणले असल्याची गोपनीय माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र मालोदे (जिल्हा परिषद यवतमाळ) यांना मिळाली. त्यामाहिती च्या आधारे कल्याण पाटील जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी (यवतमाळ), पंकज बर्ड कृषी अधिकारी (यवतमाळ), संजय वानखेडे कृषी अधिकारीपंचायत समिती मरेगाव, कृषी अधिकारी संदीप वाघमारे मारेगाव, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी सुनील निकाळजे, धिरज साळुंखे कृषी विस्तार अधिकारी मारेगाव यांच्या संयुक्त भरारी पथकाने गुरुवारी दुपारच्या सुमारास अडीच वाजता छापा टाकला असता त्यात एक लाख एक हजार दोनशे रुपये किंमतीचे कापसाचे बी-बियाणे आढळून आले. 

या कारवाईत बोगस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात एकाविरुध्द कृषी अधिकारी वाघमारे यांनी फिर्याद दाखल केली असून मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचाळा येथून एक लाखाचे बोगस बियाणे जप्त चिंचाळा येथून एक लाखाचे बोगस बियाणे जप्त Reviewed by सह्याद्री चौफेर on May 09, 2024 Rating: 5
Powered by Blogger.