सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
कोळसा खदाणीमुळे वणी तालुक्याला (ब्लॅक डायमंड सिटी) म्हणून ओळखले जाते. परंतु, या वणी शहरात गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहे. ठिकठिकाणी मटका, जुगार खुलेआम सुरू असून, पोलिसांच्या आशिर्वादामुळे हे सर्व प्रकार सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. मी स्वतः ठाणेदार यांना बंद करण्याचे तीन चार वेळा समज दिला असेही त्यांनी सांगितलं. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे, हे जेव्हा यांच्या लक्षात आल्यावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः पाहणी करून मटका जुगाराची पोलखोल केली.
दिवभर मजूर काम केल्यानंतर मटका जुगार खेळून पैसे हरतात. त्यांचा परिणाम परिवारावर होतो, शाळेच्या परिसरात खुले आम चालवतात त्यामुळे एस पी साहेबांना याबाबत माहिती दिली आहे. परंतु आता मला असले धंदे अजिबात नको, तातडीने बंद करा, चोऱ्या, दरोडा, खून हे सर्व ठाणेदार आल्यापासून वाढले भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारांनी केली मटका जुगाराची पोलखोल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 09, 2024
Rating: