सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : जगाला शांती, सत्य, अहिंसेचा संदेश देणारे जगातील पहिले वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६८ व्या जयंती निमित्त मारेगाव येथे समता सैनिक दल मिशन जय भीम यांच्या तर्फे भोजनदान व खीर वाटप करण्यात आली.
बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्म मानणाऱ्यांचा प्रमुख सण आहे. वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला, या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांना महानिर्वाणही मिळाले. बुद्ध पौर्णिमेला जगभर त्यांची जयंती साजरी केली जाते. त्याच अनुषंगाने मारेगाव येथेही बुद्ध जयंती साजरी करण्यात आली, या निमित्ताने समता सैनिक दल मिशन जय भीम तर्फे आंबेडकर चौक येथे अन्नदान व खीर वाटप करण्यात आली.
बुद्ध जयंती निमित्त अन्नदान व खीर वाटप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 25, 2024
Rating: