बोरगाव वाळू घाटावर महसूल पथकाची धाड, तीन हायवा जप्त

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील बोरगाव वाळू घाटावर अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकून दंडात्मक कारवाई साठी तीन हायावा जप्त केले असून यात एक वाळू भरलेला हायवा असून दोन हायवा (ट्रक) रिकामे आहेत.
घाट बंद असलेल्या घाटातून वाळू उपसा करून वाहणे चोरट्या मार्गाने वणी तालुक्यात धावत आहे. याबाबत संबंधित विभागाला तक्रारी, निवेदने प्राप्त होत आहे. परंतु प्रशासनाला न जुमानता वाळूचा गोरखधंदा सुरूच होता. त्यामुळे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात नेमलेल्या पथकाला कार्यान्वित करून वाळू तस्करांचे दिवस असो की रात्रीचे खेळ, हाणून पाडा अशा सूचना देत असताना गुरुवार च्या रात्री बोरगाव घाटावर अवैध उपसा होत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान गस्तीवर असलेल्या नायब तहसीलदार खिरेकर व मंडळ अधिकारी देशपांडे यांनी त्या ठिकाणी धाड टाकून एक वाळू भरलेला हायवा क्र.(एम एच 40, बी जि- 0198) व दोन त्याच ठिकाणी खाली केलेले हायवा क्र. (एम एच 40, सि टी-3742) आणि (एम एच 34, बी जि - 9064) असे या तीनही वाहणांना ताब्यात घेत तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले. या कारवाईने वाळू माफियाचे धाबे चांगलेच दनाणले आहे.
वणी तालुक्यातील वाळू घाटावरून सर्रास वाळूची अवैध वाहतुक केली जात आहे. ह्या अवैध वाळूचा उपसा रोखण्यासाठी वणी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले व तहसीलदार निखिल धुळधर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, मंडळ अधिकारी देशपांडे, तलाठी पाचभाई, इंगोले, गोहणे व मोहितकर यांनी कारवाई करिता कंबर कसल्याचे दिसून येत आहेत.
बोरगाव वाळू घाटावर महसूल पथकाची धाड, तीन हायवा जप्त बोरगाव वाळू घाटावर महसूल पथकाची धाड, तीन हायवा जप्त Reviewed by सह्याद्री चौफेर on May 25, 2024 Rating: 5
Powered by Blogger.