सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
प्रगतीचे उदिष्ट गाठण्यासाठी मनुष्याने आपले ध्येय निश्चित केले पाहीजे,असे प्रतिपादन आचार्य श्री महाश्रमणजी यांचे शिष्य मुनि अर्हतकुमारजी यांनी केले.ते मारेगाव येथील तातेड निवासात प्रथम आगमना प्रित्यर्थ उपदेश करताना बोलत होते,ते पुढे बोलतांना म्हणाले की,विना ध्येय व्यक्ती कोणत्याच ठिकाणी पोहचु शकत नाही.
याबाबतचे उदाहरण देताना ते म्हणाले की,लिफाफा ज्या पत्त्यावर पाठवायचे आहे तो पत्ता लिहिला गेला नाही तर तो लिफाफा त्याठिकाणी पोहचु शकत नाही.सोबतच प्रगती करायची असेल तर व्यक्ती ला सहनशीलता ठेवणे आवश्यक आहे.ही सहनशिलता प्रबळ होण्यासाठी देव गुरू धर्मावर श्रध्दा असावी व गुरूनी दिलेल्या मार्गदर्शनावर चालून आपले लक्ष साध्य करावे असा उपदेशात्मक प्रबोधन करत ते शेकडो कि.मी. अंतर पायदळ विहार करत आहे. मुनी अर्हतकुमारजी, मुनि भरतकुमारजी,मुनि द्विपकुमारजी आदि ठाणा तिन औरंगाबाद वरुन पायदळ विहार करत करत मारेगाव तालुक्यातील बुरांडा येथील जुमनाके यांच्या फार्म हाऊस मध्ये पोहचल्यानंतर ते मारेगाव शहरातील प्रतिभा तातेड निवासात काही वेळाच्या विश्रांती साठी थांबले होते. त्यांतर त्यांचा मांगरुळ येथील डॉ.लोढा यांच्या फार्म हाऊस मध्ये मुक्काम करुन पुढचा विहार सुरु होणार असुन आज रामदेवबाबा मंदिर कडे विहार करून उद्याला वणी येथे 10 दिवस येथे थांबण्याची संभवना आहे. तेथे प्रवचनाचा कार्यक्रम होणार असून धर्म आराधना व अध्यात्मा वर चर्चा होणार आहे.
मुनिश्रींचा आगामी चातुर्मास नागपुर येथे होणार असून ते वनोजा, मार्डी, खैरी, वडकी विहार करत करत ते चातुर्मास पुर्वी नागपूर ला पोहचणार आहे.उन्हाचा तडाखा सुरु असतानाही मुनीजींचा पायदळ प्रवास सुरु आहे.मारेगाव तालुक्यात त्यांचे आगमन झाले विहरामध्ये धर्मेंद्र भंडारी, अंकुश भंडारी, संभव भंडारी, प्रतिभा तातेड, गुनेश तातेड, आदेश तातेड, यांच्यासह जैनधर्माचे श्रावक तथा श्राविका त्याच्या सेवेत सहभाग घेत आहे.
उदिष्ट गाठण्यासाठी ध्येय निश्चित केले पाहिजे- मुनि अर्हतकुमारजी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 25, 2024
Rating: