सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
नांदेपेरा रोड हा मोठ्या प्रमाणात वर्दळीचा परिसर असून, या रोडवर वाहणांची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असते. मात्र, ही घटना आज पहाटे चार वाजता घडली असल्याचे बोलल्या जात असून नेमकं कसं घडलं आणि काय घडलं याबाबत तरी निश्चित सांगता येत नाही,परंतु आज सकाळपासून हा अपघात बघण्यासाठी नागरिकांची याठिकाणी गर्दी होत होती. शहरात दाखल होत असलेल्या चक्क कारने इलेट्रिक पोल ला धडक दिल्याने अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये या घटनेचे दृष्य टिपले असून या आश्चर्यदायक घटनेची चर्चा विविधांगी जोर धरत आहे. तूर्तास वृत्त लिहेपर्यंत घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
नांदेपेरा रोड वर भरधाव जाणाऱ्या कारची वीज खांबाला जोरदार धडक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 24, 2024
Rating: