सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ : गुरुवारी २३ मे रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात दुपारी दोन वाजता महिला पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार तर वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री म.रा यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचीत यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई बोबडे, पुष्पाताई नागपुरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
सर्वप्रथम भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून नवनिर्वाचित यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्याताई बोबडे यांचा वसंत पुरके, वामनराव कासावार यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. महिलांची संघटनात्मक बांधणी, राजकारणात महिलांचा सहभाग, तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी आपापल्या कार्यकारणी तयार करून अहवाल सादर करण्यात यावे तसेच वामनराव कासावार, वसंत पुरके, पुष्पाताई नागपुरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
या बैठकीला शालिनीताई रासेकर, डॉ मीनाक्षी सावळकर, स्वाती येंडे, वैशाली सवाई, किरण मोघे, वैशाली पिसाळकर, अर्चना हजारे, गायत्री नवाडे, मंदा बांगरे, मंजुषा हजारे, विद्या परचाके, सविता चौधरी, संजीवनी कासार, जयश्री मडावी, लियाकत बी शेख, विद्या पाताल बन्सी, सरस्वती ठाकूर, नलिनी, व कल्पना मुनेश्वर आदी सह असंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यवतमाळ : काँग्रेस कार्यालयात जिल्हा व तालुका महिला पदाधिकारी यांची बैठक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 24, 2024
Rating: