सह्याद्री चौफेर | नंदकिशोर मस्के
महागांव : दिनांक 22 मे 2024 रोजी तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेते यांची खरीप हंगामपूर्व आढावा सभा व साथी पोर्टल 2 प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी कार्यालय महागाव येथे घेण्यात आली. सभेकरीता श्री कल्याण पाटील जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी शिवनेरी चव्हाण, पंचायत समिती कृषी अधिकारी श्री.राठोड, कृषी विस्तार अधिकारी निरावार व महागाव तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा संचालक उपस्थित होते.
यावेळी कृषी निविष्ठा विक्रेत्यांना मार्गदर्शन करतांना श्री कल्याण पाटील यांनी बियाणे वितरण सनियंत्रणासाठी व बोगस बियाण्यांना आळा घालण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या साथी ॲप बद्दल माहिती दिली.
तालुका कृषी अधिकारी शिवनेरी चव्हाण यांनी गुणवत्तापूर्ण रासायनिक खते,किटकनाशके व बियाणे विक्री संबंधी सूचना दिल्या,श्री राठोड यांनी खताची विक्री पीओएस मशीनद्वारे करणे, लेबल क्लेमनुसार किटकनाशकाची विक्री करणे इत्यादी सूचना दिल्या.