सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे
23 मे रोजी वैशाख पौर्णिमेच्या पर्वावर आदिवासी समाज बांधव पवित्र स्नानासाठी व देवदर्शनाकरीता येणाऱ्या आदिवासी भाविकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव, अमित भोईटे तहसीलदार राळेगाव, रामेश्वर वेंजणे उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा, गटविकास अधिकारी केशव पवार, राळेगाव पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव,तसेच आरोग्य विभाग, लाईफबोट, तसेच भक्तांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून स्वत: हजेरी लावली होती.या प्रसंगी भाविकांना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची महसुल प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन दल, अग्निशमक दल हे विशेष लक्ष ठेवून नदी पात्राच्या पाण्याच्या जवळ आपले पोलिस कर्मचारी तसेच महसुलचे कर्मचाऱ्यांनी पहरा दिला असून कोणीही खोल पाण्यात जाणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली. दरम्यान, कुठलाही अनुच्छित प्रकार घडणार नाही यासाठी महसुल प्रशासन, पोलिस प्रशासन आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन दल व मंदीर समितिच्या वतीने सोईसुविधा पुरविण्यात आल्या होत्या. आदिवासी समाज बांधवांच्या सुरक्षितेची यावेळी अधिक काळजी घेण्यात आली.
तमाम आदिवासी समाजाचे पंढरपुर म्हणून ओळखले जाणाऱ्या जागजई येथे पवित्र स्नानसाठी व देवदर्शन करण्यासाकरीता आलेल्या सर्व आदिवासी देवाचे दर्शन घेण्याकरिता वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री म.रा., अंकुश मुनेश्वर, अरविंद वाढोणकर, राजेंद्र तेलंगे, व ईतर पदाधिकारी सुद्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागजई येथे उपस्थिती दर्शविली होती.
लाखों आदिवासी बांधवाचे जागजई येथे वैशाखस्नान व देवदर्शन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 23, 2024
Rating: