कोळश्याच्या खाणीतील अनमोल हिरा-संजय खाडे

अभिष्टचिंतन | वाढदिवस 

संजय खाडे व माझी ओळख गेल्या २५ वर्षापासुन ची आहे. मी नोकरीच्या निमित्याने वणीत आलो. व नंतर सामाजिक कार्यात सक्रिय झाल्यानंतर अनेकांच्या संपर्कात आलो. त्यातील एक ध्येयवेडे व्यक्तीत्व म्हणजे संजय खाडे हे आहे.
संजय रामचंद्र खाडे यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुंटूबात उकणी ता. वणी जि. यवतमाळ येथे २३ मे १९७० रोजी झाला. त्यानी शालेय शिक्षण पुर्ण केल्यानंतर कोल माईनस मध्ये नोकरी पत्करली. नोकरीत असताना त्यांनी "जनसेवा हिच इश्वर सेवा" हे ध्येय स्विकारून त्यांनी नोकरी बरोबरच समाज सेवेस प्रारंभ केला. ते उकणी गावचे १५ वर्षे सरपंच होते. सरपंच पदाच्या कालावधीत अनेक लोकोपयोगी योजना त्यांनी उकणी गावाच्या विकासासाठी प्रभावीपणे राबविल्या, त्या कार्यकुशलते मुळेच राहुल गांधीच्या महाराष्ट्राच्या यंग ब्रिगेड मध्ये सन २००८ मध्ये त्यांचा श्रीमती मा. यशोमती ठाकुर, स्वर्गिय निलेश पारवेकर यांचे नेतृत्वात वावर सुरू झाला. ही गौरवाची बाब आहे. तेव्हापासुन सुरू झालेल्या त्यांचा राजकिय व सामाजिक कार्याचा प्रवास हा सतत उंचावतच जात आहे.
ते १. शिवकृपा शेतकरी फाउन्डेशनचे उकणी अध्यक्ष आहेत.
२. रंगनाथ स्वामी शेतकरी उत्पादक कंपणीचे अध्यक्ष आहेत.
३. जय जगन्नाथ मल्टीस्टेट केडीट को. ऑफ सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष आहेत. ४. दि. वसंत सह. जिनींग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरी वणी चे संचालक आहेत.
५. महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंध मर्यादित, मुंबई चे संचालक आहेत.
सध्या ते वरील निरनिराळया पदावर कार्यरत आहे. त्यांनी सहकार क्षेत्रात नाव लैकीक मिळविला आहे. त्यांनी वणी येथे भव्य शंकरपटाचे आयोजन केलेले आहे. त्यांचा कामगार चळवळीत सक्रिय सहभाग असुन त्यांनी सामाजिक चळवळीत दानत्व स्विकारलेले आहे. शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या भल्यासाठी ते सतत संघर्षरत आहे. गाव खेडयात सामान्य शेतकरी कुटुंबाच्या पोटी जन्मलेल्या संजय खाडे यांचा हा जीवन प्रवास खरच मनाला थक्क करणारा आहे. त्यांचे हे जीवन कोळश्याच्या खाणीतील एका अनमोल हिऱ्यासारखे मौल्यवान आहे. आज त्यांचा ५४ वा वाढदिवस त्यांना भरभरूण शुभेच्छा...!!

- उत्तम गेडाम 
रा. रवी नगर ता. वणी जि. यवतमाळ 
मो.न. ९८२३९२४८५५
कोळश्याच्या खाणीतील अनमोल हिरा-संजय खाडे कोळश्याच्या खाणीतील अनमोल हिरा-संजय खाडे Reviewed by सह्याद्री चौफेर on May 23, 2024 Rating: 5
Powered by Blogger.