टॉप बातम्या

लिपीक हबीब शेख यांचे अल्पशा आजाराने निधन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील नगर पंचायतचे वरिष्ठ लिपीक शेख हबीब शेख लाल यांचे आज दि.28 मे रोजी साय.6 वा. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते 44 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व 2 मुली असा आप्तपरिवार आहे.

हबीब मागील 2 महिन्यापासून कावीळ आजाराने ग्रस्त होते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सेवाग्राम (जि. वर्धा) येथे दाखल करण्यात आले. येथे चार दिवसापासून उपचार घेत होते. परंतु प्रकृतीत सुधारणा जाणवत नसल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलवीत असताना शेख हबीब यांनी अखेर चा श्वास घेतला.

      
Previous Post Next Post