सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
तालुक्यातील सावंगी, कोसारा घाटातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. त्यामुळे महसूल पथक होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर नजर ठेऊन होते. आज दिनांक 29/5/2024, बुधवार रोजी पहाटे 2.45 वाजता मार्डी चौफुली, आदर्श शाळेजवळ अवैध उत्खनन करून वाळू वाहतूक करीत असताना एक ट्रक पकडण्यात आला आहे.
ही कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या उपस्थितीत,मंडळ अधिकारी अमोल गुघाने, तलाठी सनी कुळमेथे, विवेश सोयाम व वाहन चालक विजय किनाके यांनी केली. ह्या धडक कारवाईने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकात चांगलीच दहशत पसरली आहे.
तहसीलदारांनी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 29, 2024
Rating: