विवो कंपनीचा सापडलेला मोबाईल केला परत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अनेकदा फोन हरविण्याच्या घटना घडत असतात, मग कुठे रस्त्यात, बसमध्ये, अगदी कुठेही. मात्र अनेकदा हे मोबाईल सापडत नाहीत. पण काहीवेळा माणुसकीमुळे अनेकजन मोबाईल परत करतात. आज प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे, मात्र मोबाईल फोन एकदा हरवला की परत मिळणे कठीण होऊन बसते. तर काहीवेळा अनेक माणसे स्वतःहून मोबाईल फोन परत करत असतात.
तसाच काहीसा प्रकार वनोजा देवी परिसरात पहायला मिळाला. काल दिवसा (ता.27) मे ला प्रशांत भंडारी उपसरपंच वनोजा देवी येथील रहिवासी हे नेहमीप्रमाणे शेत शिवारात जात असतांना त्यांना विवो (vivo) कंपनीचा मोबाईल सापडला. त्यांनी बराच वेळ तेथील परिसरात कोणी मोबाईल संबंधित चौकशी करेल याची वाट बघितली, पण कोणीही आले नाही. 
एखाद्या व्यक्तीला स्क्रीन टच मोबाईल सापडला तर तो खूप खुश होतो. परंतु त्यांनी मोबाईल सापडल्यानंतर, हा मोबाईल कोणाचा हरवला असेल, तो व्यक्ती किती काळजीत असेल असा विचार करत आज सकाळी प्रशांत भंडारी यांनी सापडलेला मोबाईलच्या मूळ मालकापर्यंत पोहचवण्यासाठी गावात लाऊडस्पीकरने दिवंडी मारून चौकशी केली असता मोबाईल हा गावातीलच रोशन आस्वले यांचा असल्याचे समजले. यावेळी प्रशांत भंडारी यांनी आज दि. 28 मे ला संबंधित मोबाईलच्या मूळ मालकाच्या वडिलांना हरवलेला मोबाईल परत दिला. यावेळी विठ्ठल आस्वले यांनी मोबाईल परत केल्यानंतर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 
प्रशांत भंडारी यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक केले. असा प्रामाणिकपणा आजकाल क्वचितच पाहावयास मिळत आहे. परिसरात सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विवो कंपनीचा सापडलेला मोबाईल केला परत विवो कंपनीचा सापडलेला मोबाईल केला परत Reviewed by सह्याद्री चौफेर on May 28, 2024 Rating: 5
Powered by Blogger.