टेंशन ची मात्रा मनोरंजनात्मक, सामाजिक प्रबोधनातून छुमंतर...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मदनापुर येथे "टेन्शन ची मात्रा वणीची हास्य जत्रा" सामाजिक, प्रबोधनात्मक व संदेश देणारी लघु नाट्य व लोककला माध्यमातून मारेगाव येथील क.वा. व वि. महाविद्यालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना चे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर तालुक्यातील मदनापुर येथे सुरू आहे.

शिबिरात बौद्धिक सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामुळे वणी शहरातील सागर झेप बहुउद्देशी संस्थेच्या वतीने संदेशात्मक व मनोरंजनात्मक लोकनाट्य सादर करण्यात आले. शेतकरी नवरा नको म्हणनाऱ्यासाठी अतिशय मनोरंजनात्मक पद्धतीने कांदा पोहे या नाटीके द्वारे ज्येष्ठ नाट्य कलावंत, अशोक सोनटक्के, एस बि आय (SBI) लाईफ इ्शुरन्स चे सिनियर एजेंसी मॅनेजर शैलेश अडपावार, प्रा. सीमा सोनटक्के, प्रिया कोणप्रतीवार, राधा सोनटक्के यांनी आपल्या उत्कृष्ट कलेच्या द्वारे रसिकांना खिळवून ठेवले.

 'पप्पा' या लघुनाटीके मध्ये संस्थेचे अध्यक्ष सागर मुने यांनी विविध प्रकारचे अभिनय करून त्यांना पप्पा लघु नाटकातील सासरे, मारेगाव येथील कार्यरत प्राध्यापक प्रवीण सातपुते यांचे धक्का देणारे संवाद, गौरव नायानवार याचा हसवणारा भाऊजी हा संवाद आणि पप्पा म्हणून सतत बोलणारी व प्रत्येक वाक्याला खदखद हसणारी राधा सोनटक्के यांनी जबरदस्त छाप सोडल्याने गावातील रसिकांना चांगलेच हसून हसून लोटपोट केले.

संदीप उरकुडे व सागर मुने यांनी शहरातील लोकांपेक्षा गावातील नागरिक किती हुशार असतात. हे त्यांच्या संवाद आणि अभिनयाच्या बळावर दाखवून दिले. छोट्यातला छोटा व्यवसाय सुद्धा भरपूर पैसे देतो. कोणताच व्यवसाय कमी समजू नये, अशी बँक ही लघु नाटिका सादर करून मीना वानखेडे यांनी आपल्या अभिनयाने नवऱ्याला साथ कशी द्यायची व व्यवसाय कसा वाढवायचा हा सकारात्मक संदेश देण्यात आला.

या लोकनाट्यला पार्श्वसंगीत गौरव नायनवार,राधा सोनटक्के व ढोलक मधुसूदन मत्ते यांनी सुरेख साथ दिली. या वेळी महाविद्यालयातील तथा गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उवस्थित होते. 
टेंशन ची मात्रा मनोरंजनात्मक, सामाजिक प्रबोधनातून छुमंतर... टेंशन ची मात्रा मनोरंजनात्मक, सामाजिक प्रबोधनातून छुमंतर... Reviewed by सह्याद्री चौफेर on February 08, 2024 Rating: 5
Powered by Blogger.