सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
बोर्ड परीक्षेत टॉपर होण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त खाली नमूद केलेल्या 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही कोणत्याही बोर्डाचे विद्यार्थी असलात तरी या 5 गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कोणत्याही परीक्षेत टॉप करू शकता.
1. अभ्यास करण्यास टाळाटाळ करू नका:
बोर्डाच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी उद्याचा अभ्यास पुढे ढकलण्याच्या सवयीपासून दूर राहा. बरेच विद्यार्थी ही चूक करतात. शेवटच्या क्षणी काहीही अभ्यास करण्यापेक्षा परीक्षेच्या काही दिवस आधी अंतिम उजळणी केल्यास तुम्हाला परीक्षेच्या वेळी ताण येणार नाही.
2. अभ्यासक्रमाकडे लक्ष द्या:
बोर्ड परीक्षेच्या अभ्यासक्रमाकडे लक्ष न दिल्यास काही महत्त्वाचे विषय किंवा माहिती चुकू शकते. अभ्यास करताना नेहमी बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम समोर ठेवून बसा.
3. वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे:
एसएससी, एचएससी, सीबीएसई, आयसीएसई, आरबीएसईच्या कोणत्याही बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर वेळेचे व्यवस्थापन करा. तुमच्या वेळेचा सदुपयोग करा आणि प्रत्येक विषयाकडे समान लक्ष द्या.
4. सोशल मिडियापासून दूर राहा:
प्रत्येकाला सोशल मीडियावर वेळ घालवणे आवडतं. पण सोशल मीडियाचा वापर करताना वेळेवर नियंत्रण राहत नाही. अशातच तुम्ही वेळ वाया न घालवता त्याऐवजी तुमच्या वेळेची अभ्यासात गुंतवणूक करू शकता. जेणेकरून परीक्षेत तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतील.
5. तुमच्या खाण्याच्या आणि झोपेच्या सवयींमध्ये सुधार करा:
बोर्ड परीक्षेच्या तयारीदरम्यान आरोग्यदायी आणि घरी शिजवलेले अन्न खाण्याची सवय लावा. या काळात तुम्ही तुमचे आरोग्य बिघडवण्याचा धोका पत्करू शकत नाही. एकाग्रता आणि चांगल्या स्मरणशक्तीसाठी 7-8 तासांची झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे.
बोर्डाच्या परीक्षेत टॉप करायचं? आजच बदला या 5 सवयी..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 08, 2024
Rating: