सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : माता रमाई आंबेडकर यांची 126 वी जयंती धम्मराजीका बुद्धविहार, मारेगाव येथे साजरी करण्यात आली. रमाबाई महिला समिती च्या वतीने वेशभूषा व बाल गोपाल तथा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.देठे मॅडम व भाग्यश्री शंभरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बुद्ध पूजन करण्यात आली.
रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रमाबाई ची वेशभूषा, मार्गदर्शन व नृत्य असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या करिता परीक्षक म्हणून सौ जुमडे मॅडम, उज्वल शंभकर, दातार सर यांनी काम पाहले. या स्पर्धांमध्ये गावातील महिला उपासिका पुष्पा ताकसांडे, पूनम पुनवटकर, कमल बहादे, यांनी भाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदना रायपुरे, शितल तेलंग, मोनाली रायपुरे, यांनी पुढाकार घेतला. तसेच महिला उपासिकानी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले त्यांना संयोजन समितीतर्फे बक्षीस तसेच श्री खानझोडे यांचे कडून सुद्धा प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.
मारेगाव येथे माता रमाई आंबेडकर जयंती साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 09, 2024
Rating: