महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व मा. ना. एकनाथरावजी शिंदे (मुख्यमंत्री) यांच्या वाढदिवस निमित्ताने रुग्णांना फळ वाटप

सह्याद्री चौफेर | वृरसंस्था 

मारेगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त येथील मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम माननीय विशाल भाऊ किन्हेकार तालुकाध्यक्ष मारेगाव यांच्या नेतृत्वात प्रमुख पाहुणे सुधाकर भाऊ गोरे उपजिल्हाप्रमुख किशोरभाऊ नांदेकर तालुकाध्यक्ष वणी, विजय मेश्राम शहर प्रमुख मारेगाव, प्रवीण भाऊ बलकी, सुरेश भाऊ लांडे, राजूभाऊ खडसे,धर्मा जाधव, प्रशांत भंडारी, डॉक्टर बदकी, महेश ढुमणे, नितीन कापसे, स्वप्निल त्रिवेदी, धनराज भट, आनंद नक्षीणे, तेजस कापसे, उमेश उलमाले, युवराज ठाकरे युवा सेनाध्यक्ष वणी व असंख्य शिवसैनिक (शिंदे गट) मारेगाव तालुका उपस्थित होते.
अवघ्या महाराष्ट्रातील सर्व सामान्यांच्या भक्कम आधारस्तंभ, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा असे स्वाभिमानी, महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांना जन्मदिनाच्या निमित्ताने मारेगाव शाखा च्या वतीने आमच्या शुभेच्छा असे तालुका प्रमुख विशाल किन्हेकार यांनी सह्याद्री चौफेर च्या माध्यमातून दिल्या.
महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व मा. ना. एकनाथरावजी शिंदे (मुख्यमंत्री) यांच्या वाढदिवस निमित्ताने रुग्णांना फळ वाटप महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व मा. ना. एकनाथरावजी शिंदे (मुख्यमंत्री) यांच्या वाढदिवस निमित्ताने रुग्णांना फळ वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on February 09, 2024 Rating: 5
Powered by Blogger.