सह्याद्री चौफेर : रूस्तम शेख
कळंब : कळंब शहरात नगर पंचायत कळंब अर्तगत कळंब शहरात अशोका सोलर कंपनी ला सोलर लाईट बसविण्याचे ठेका देण्यात आला होता.सदर कंपनीने सोलर लाईट बसवितांना अटी व शर्तीचे पालन न करता नियमाला बगल देत निकृष्ठ काम करून करोडो रुपयाचा भष्ट्राचार केल्या मुळे त्या संबधित कामाची सखोल चौकशी करून अशोका सोलर कंपनी नागपुर व संबधित शासकिय यंत्रणा यांच्या वर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी या बाबत मुख्यधिकारी न प कळंब यांना यापूर्वी निवेदन देण्यात आले आहे. परंतु याची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसुन कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणुन संविधानिक मार्गाने प्रशासनाला जागे करून मागणी पुर्ण व्हावी या उद्देशाने माजी नगर सेवक अब्दुल अजीज अब्दुल सत्तार व विद्यमान नगरसेवक मा कुशल रामभाऊजी बोकडे हे दिनांक 8/2/ 2024 पासुन कळंब नगर पंचायत कार्यालय समोर आमरण उपोषणला बसले आहे.
आज उपोषणाचा चौथा दिवस असतांना सुद्धा प्रशासन व लोकप्रतिनिधीनी गांर्भियाने दखल घेतली नसुन सकारात्मक निर्णय घेतलाला नाही. उपोषणकर्ते नामे मा अब्दुल अजीज अब्दुल सत्तार व मा कुशल रामभाऊ जी बोकडे यांची प्रकृती खालावली असुन चिंताजनक आहे तेव्हा प्रशासनाने गार्भीयाने दखल घेऊन उपोषणकर्त्याचे मागणी संदर्भात सकात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी कळंब शहरवासीयांची आहे
या आमरण उपोषणाची दखल न घेतल्यास उपोषणकर्त्याची प्रकृती खालवुन गंभीर झाल्यास कळंब शहर बंद करण्यात येईल असा तिर्व इशारा कळंब व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद उरकुडे यांनी दिला आहे. त्यामुळे शहरातील शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे. तरी प्रशासणाने याची गांर्भीयाने दखल घेऊन सकात्मक निर्णय घ्यावा अशी कळंब शहरवासीयांची मागणी जोर धरत आहे.
उपोषणकर्त्याची प्रकृती चिंताजनक प्रशासनाने दखल घ्यावी - शहवासीयांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 11, 2024
Rating: