आ.डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वात व तहसिलदार धिरज स्थुल यांच्या उपस्थितीत उपोषणकर्ते अब्दुल अजीज व कुशल बोकडे यांनी सोडले उपोषण
सह्याद्री चौफेर | रूस्तम शेख
कळंब : कळंब शहरात सोलर लाईटचे काम निकृष्ठ दर्जाचे करून भष्टाचार झाल्याने सदर कामाची चौकशी करून अशोका सोलर कंपनी व संबधित शासकीय यंत्रणा यावर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी, या मागणी संदर्भात संविधानिक मार्गाने प्रशासनाला जागे करून मागणी पुर्ण व्हावी या उद्देशाने माजी नगर सेवक अब्दुल अजीज अब्दुल सत्तार व विद्यमान नगरसेवक मा. कुशल रामभाऊ बोकडे हे दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ पासुन कळंब नगर पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसले होते.
आज आमरण उपोषणाचा चौथा दिवस असल्याने उपोषणकर्ते मा.अब्दुल अजीज अब्दुल सत्तार व विदयमान नगर सेवक कुशल रामभाऊ बोकडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच तातडीने आमदार डॉ. अशोक उईके व तहसिलदार धिरज स्थुल यांनी उपोषणकर्त्याची प्रत्यक्ष भेट घेतली.
या प्रसंगी उपोषणकर्त्याशी सविस्तर चर्चा करून जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत चौकशी समिती स्थापण करून त्या समिती मार्फत सोलर लाईटच्या कामाची सखोल चौकशी करण्यात येईल असे, आश्वासन आमदार डॉ. अशोक उईके व तहसिलदार धिरज स्थुल यांनी उपोषणकर्ते यांना दिले. त्यांचा सन्मान ठेवून उपोषणकर्ते अब्दुल अजीज व विद्यमान नगर सेवक कुशल बोकडे यांनी उपोषण सोडले.
चौकशी समिती स्थापण करतांना समिती मध्ये उपोषणकर्त्याचे नाव व त्यांचे प्रतिनिधींना समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्ते माजी नगर सेवक अब्दुल अजीज व नगर सेवक कुशल बोकडे यांनी या प्रसंगी केली.
दरम्यान,सात दिवसाच्या आत चौकशी समिती स्थापण न झाल्यास पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबित करण्यात येईल असा तीव्र इशारा उपोषणकर्त्यांनी यावेळी दिला.
उपोषणकर्त्याचे मागणी संदर्भात प्रशासनाने त्वरीत सकात्मक निर्णय घेऊन चौकशी समिती स्थापण करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांसह कळंब शहरवासीयांनी सुद्धा केली आहे.
आ.डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वात व तहसिलदार धिरज स्थुल यांच्या उपस्थितीत उपोषणकर्ते अब्दुल अजीज व कुशल बोकडे यांनी सोडले उपोषण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 11, 2024
Rating: