सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
सविस्तर असे की, गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथक पोहचले. गाडगेबाबा चौक येथील उभे असलेल्या सदर वाहनातील मागील डाल्यात पाहणी केली असता सदर वाहनात ब्रेड, दुध वाहुन नेण्याचे रिकामे झालेले प्लास्टीकचे एकुन 85 नग हे दिसले त्यामागे पांढ-या रंगाचे एकुन 13 (बोरी) गोणी दिसुन आले. त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले सुगंधीत तंबाखुचा वास येत असल्याने नमुद वाहन चालक यास पंचासमक्ष विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, नमुद गोणी मध्ये प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु आहे. त्यामुळे वाहन क्र. ((MH- 31-CQ-8815) व त्या मधील मुद्देमालासह घटनास्थळ पंचनामा करून पो.स्टे ला ताब्यात घेण्यात आले व पुढील योग्य ती कार्यवाही करण्याकरीता अन्न व सुरक्षा प्रशासन विभाग यवतमाळ अधिकारी यांना माहीती दिली. अन्न सुरक्षा अधिकारी जि.पी दंदे यवतमाळ यांचे फिर्याद वरून अप क्रमांक 75/2024 कलम 188,272, 273, 328,34 भादवि सहकलम अन्न सुरक्षा मानके कायदा 2006, नियम व नियमने 2011 चे कलम 59 अन्वये गुन्हा नोंद करून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले सुगंधीत तंबाखुचे 200 ग्राम वजनाचे 520 डब्बे कि.4,86200/- रुपये वाहतुक करण्यास वापरलेली वाहन टाटा कंपनीचा एल.पी.डी 407,कि. 10,00000/- रूपये असा एकुना 14,86,200/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील नमुद आरोपी हे वाहन चालक व वाहक असुन त्यांनी आणलेला मुद्देमाल कोठुन व कोणाकडुन आणला तसेच कोणाला देणार होते याबाबत सखोल तपास करणे सुरू आहे.
सदरची कार्यवाही डॉ. पवन बन्सोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किद्रे उप.वि.पो.अ.वणी पोलीस निरिक्षक अनिल बेहेरानी ठाणेदार वणी यांचे मार्गदर्शनात सपोनि, माधव शिंदे, सफौ, सुदर्शन वानोळे, पोना पंकज उंबरकर, पोका विशाल गेडाम, पोकों श्याम राठोड, पोकों-मो वसिम व पोकॉ- गजानन कुळमेथे यांनी केली.
चक्क दुध, ब्रेड च्या डिलेव्हरी वाहणातून अवैधरित्या सुगंधित तंबाखू ची वाहतूक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 11, 2024
Rating: