घोडधरा येथे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते पार पडला सभा मंडपाचे भूमिपूजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील घोडदरा येथे (ता.11 फेब्रु.) ला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५५ वा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने समाज मंदिराचे भूमिपूजन वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ लांबट व नगरसेवक हेमंतभाऊ नरांजे हे होते. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता पोलीस पाटील अनिल पाटील रोगे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रमेश गोचे, उपाध्यक्ष सूर्यभान रोगे, बापूजी चांदेकर, बंडूभाऊ मोरे, मारुती देऊळकर, व दयालभाऊ रोगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
घोडधरा येथे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते पार पडला सभा मंडपाचे भूमिपूजन घोडधरा येथे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते पार पडला सभा मंडपाचे भूमिपूजन Reviewed by सह्याद्री चौफेर on February 12, 2024 Rating: 5
Powered by Blogger.