ओबीसी चा एल्गार मोर्चा : आज वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने 'OBC' धडकणार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सरकारने OBC (VJ, NT, SBC) ची जातनिहाय जनगणना करावी तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये व त्यांचा 'ओबीसी'मध्ये समावेश करण्यात येऊ नये. या प्रमुख मागण्यांकरीता वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने आज रविवार दि.11 फेब्रुवारी ला ओबीसीचा एल्गार मोर्चा धडकणार आहे. या मध्ये वणी मारेगाव झरी तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील ओबीसी प्रवर्गातील सर्व समाविष्ट जातीच्या लोकांनी बहुसंख्येने मोर्चा मध्ये सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी कृती समिती च्या वतीने करण्यात येते. 

आपल्या ओबीसीच्या हक्काच्या मागणीसाठी ओबीसीची जात निहाय जनगणना झालीच पाहिजे, ओबीसी मध्ये मराठा समाजाला सरसकट समाविष्ट करण्यात येऊ नये, जिल्ह्यामध्ये 72 वस्तीगृहाची स्थापना करण्याचे आश्वासन सरकारने दिले असून सुद्धा त्यावर अजून पर्यंत कोणतेही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे 72 वसतिगृहांची स्थापना करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एससी-एसटी प्रमाणे शिष्यवृत्ती उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाचे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा अनेक मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या साठी दिल्ली येथील ओबीसी प्रवक्ते श्री.मा. प्रा. डॉ. लक्ष्मण यादव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्या अनुषंगाने वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी बहुसंख्येने मोर्चामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
ओबीसी चा एल्गार मोर्चा : आज वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने 'OBC' धडकणार ओबीसी चा एल्गार मोर्चा : आज वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने 'OBC' धडकणार Reviewed by सह्याद्री चौफेर on February 10, 2024 Rating: 5
Powered by Blogger.