सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : प्रजासत्ताक दिनाचा सन्मान राखुन दि.26 जानेवारी 2024 ला होणारे "चक्का जाम आंदोलन" स्थगित करण्यात आले होते. उद्या दि.6 फेब्रुवारी 2024 रोज मंगळवार ला मारेगावात दुपारी 12 वा. चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
मागील वर्षांपासून एकमेव असलेल्या कोसारा डेपो मधून रेती उपसा झाला मात्र,तालुक्यातील लाभार्थ्यांना कणभर रेती मिळाली नसल्याने मारेगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना रेती मिळावी यासाठी उद्या मंगळवारी "चक्का जाम आंदोलन" करण्यात येत आहे. अशी माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख विशालभाऊ किन्हेकार यांनी दिली.
मारेगाव तालुक्यातील संपूर्ण गवंडी कामगार, मजूर, बिल्डिंग मटेरियल यांच्या वर उपास मारीची वेळ आली आहे.तसेच घरकुल लाभार्थी वाळू साठी वणवण फिरत असताना मात्र,प्रशासन बघ्याची भूमिका घेत होते. त्यामुळे कोसारा रेती घाटाची सखोल चौकशी करुन तहसिलदार व महसुल अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) यांच्या पक्षा तर्फे 19 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेत तालुका प्रमुख विशाल किन्हेकार यांनी केली होती. याबाबत चौकशी व कारवाई केली नाही तर मारेगावात चक्का जाम आंदोलन करण्यात येइल असा थेट असा ईशाराही देण्यात आला होता.
परिणामी आजतागायत कोणतीही कारवाई वा चौकशी झाली नाही नसल्याने उद्या मंगळवारी दुपारी प्रशासनाच्या विरोधात उद्या चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. या होणाऱ्या आंदोलनास मारेगाव तालुक्यातील गरजवंत, घरकुल धारक, संबंधित सर्व जनतेनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख विशाल किन्हेकार यांनी केले.
मारेगावात उद्या चक्का जाम; आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन – विशाल किन्हेकार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 05, 2024
Rating: