राष्ट्रवादीचे नगरसेवक हेमंत नरांजे यांचा भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील विराणी हॉल येथे वणी विधानसभा मतदार संघाची भारतीय जनता पार्टीची 'गाव चलो अभियान' वणी मारेगाव झरी तालुका कार्यशाळा 4 जाने.2024 ला आयोजित करण्यात आली होती. त्यात मारेगाव नगर पंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हेमंत नरांजे यांनी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय संजीवरेडी बोदकुरवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. तारेंद्र बोर्डे यांचे नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला.

आमदार श्री.बोदकुरवार यांच्या विकासात्मक कार्याला प्रेरित होऊन आणि नगरसेवक म्हणून निवडून आल्या वर जनतेनी दिलेली जबाबदारी योग्य पार पडावी म्हणून त्यांनी पक्षात प्रवेश केला असे ते म्हणाले, यावेळी चंद्रपूर आर्णी लोकसभा विस्तारक रवी बेलुरकर,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष दिनकरराव पावडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, भाजपा तालुका अध्यक्ष श्री. अविनाश लांबट, भाजपा तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, गणपत वराटे, वैभव पवार नगरसेवक, डोमाजी भादिकर व इतर सर्व भाजपा तालुका पदाधिकारी व महिला आघाडीचे सर्व भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ला ठोकत त्यांचा भाजपात पक्ष प्रवेश होणं ही बातमी सर्वांसाठी उत्साहवर्धक आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक हेमंत नरांजे यांचा भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश राष्ट्रवादीचे नगरसेवक हेमंत नरांजे यांचा भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश Reviewed by सह्याद्री चौफेर on February 05, 2024 Rating: 5
Powered by Blogger.