वणी : दि. 21 जानेवारी 2024 रोजी TDRF उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी येथे TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद यांच्या हस्ते TDRF ध्वजाचे ध्वजारोहण करून TDRF ध्वज दिवस साजरा करण्यात आला. या ध्वजदिवस कार्यक्रमासाठी विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील ३०० TDRF अधिकारी व जवान TDRF ध्वजास मानवंदना देण्याकरिता उपस्थित होते.
TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद यांच्या शुभहस्ते TDRF ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण नंतर राष्ट्रगीताने TDRF ध्वजास उपस्थित सर्व TDRF अधिकारी व जवानानकडून सलामी (मानवंदना) देऊन भारत भूमि कि जय, TDRF ध्वज कि जय च्या जय घोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. तद्नंतर TDRFमुख्य क्षेत्रीय अधिकारी यांनी उपस्थितांना मा. TDRF संचालक हरिश्चंद्र ब. राठोड यांच्या शुभ संदेशाचे वाचन करून दाखविले “ राष्ट्र ध्वजाप्रमाणेच TDRF ध्वज आम्हा सर्वाना राष्ट्रसेवा व नागरी सुरक्षेसाठी प्रेरित करतो सोबतच राष्ट्रसेवेत कार्यरत राहून भारताला विश्वगुरु बनविण्यासाठी TDRF आपले पूर्ण योगदान देईल,TDRF ध्वज नेहमीच राष्ट्रध्वजाच्या सन्मानात यापुढेही सदैव कार्यरत राहील” असे TDRF संचालक यांनी शुभ संदेशाच्या माध्यमातून सांगून सर्व TDRF अधिकारी व जवानांना TDRF ध्वज दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर TDRF अधिकारी व जवानांसाठी नगर भवन येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून वणीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले उपस्थित होते. सोबतच विशेष अतिथी म्हणून वणीचे उपविभागीय अधिकारी गणेश किद्रे उपस्थित होते.
राष्ट्र्वंदनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तद्नंतर TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद यांनी प्रस्तावना करीत TDRF च्या कार्याची माहिती देत TDRF ध्वजाबद्दल माहिती दिली.त्यांनतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी नितीनकुमार हिंगोले यांनी “TDRF जवान आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात” असे सांगून TDRF च्या कार्याचे कौतुक करून सर्व TDRF जवानांना TDRF ध्वज दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी “विद्यार्थ्यांना यशस्वी व सुजान नागरिक करण्यासाठी TDRF एक महत्वाचे माध्यम आहे व TDRF मधून प्रशिक्षित विद्यार्थी हा आपल्या देशाचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्नशील असेल” असे सांगून सर्व TDRF जवानांना TDRF ध्वज दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
TDRF (Target Disaster Response Force) ध्वज / चिन्हाला भारत सरकार द्वारे अधिकृत मान्यता मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे
या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी व मार्गदर्शन कार्यक्रमासाठी गणेश बुरांडे,साहिल लोखंडे,वेदिका येरकडे, हर्षली मालेकर,प्रेम उईक,किरण अत्राम,शिव उईके,वितेश वंजारी,सुमित जुमनाके,वैभव मडावी,ईशा जुनगरी,प्रेम सातपुते,रोशन तुमराम,श्रुती बोंडे,प्राची डोंगे,पृथवी पेंदोर,प्राची खोके, अस्मित साहू, कुंदन साहू, सानिका सोनटक्के,आकांक्षा मांढरे,राजनिकांत कुडसंगे,अनुश्री येटे, प्रता केथल तसेच वणी पोलीस स्टेशन च्या पोलीस उपनिरीक्षक माया चाटसे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोकराव सोनटक्के, सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी चावणे, विवेकानंद विद्यालयाचे जगदीश ठावरी, ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र चे संचालक वैभव ठाकरे, नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले,जलील सय्यद ,खैरून सय्यद, संगीता तेमुर्डे,अर्चना मुजगेवार, शारिक सय्यद,अश्विनी रामगिरवार व नागतूरे, साशी मुजगेवार इत्यादी युवकांची व नागरिकांची उपस्थिती होती.
TDRF उपविभागीय कार्यालय वणी TDRF ध्वज दिवस साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 25, 2024
Rating: